दत्तक्षेत्रे
दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांच्या लीलांनी पावन झालेली क्षेत्रे.
- ॐ२०एकमुखी दत्त मंदिर, अहिल्यानगर, महाराष्ट्र थोर तपस्वी राजाराम महाराज धर्माधिकारी (समाधी १८४०)
- ॐ१पीठापूर (पिठापुरम), आंध्र प्रदेश श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचा पहिला कलियुगी अवतार
- ॐ२कुरवपूर (कुरुगड्डी), कर्नाटक श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी व गुप्त होण्याचे स्थान
- ॐ३गोकर्ण महाबळेश्वर, कर्नाटक श्रीपाद श्रीवल्लभ यांचे वास्तव्य; गुरुचरित्र अ. ६–७
- ॐ४कारंजा (लाड), महाराष्ट्र श्री नृसिंह सरस्वती (दुसरा दत्तावतार) यांचे जन्मस्थान
- ॐ५काशी (वाराणसी), उत्तर प्रदेश दत्तांचे स्नानस्थान; श्री नृसिंह सरस्वतींची संन्यासदीक्षा
- ॐ६परळी वैजनाथ, महाराष्ट्र श्रीगुरूंचे गुप्त वास्तव्य (अ. १५)
- ॐ७औदुंबर, महाराष्ट्र श्री नृसिंह सरस्वतींचा चातुर्मास (अ. १६–१९)
- ॐ८नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी), महाराष्ट्र श्री नृसिंह सरस्वतींचे १२ वर्षे वास्तव्य
- ॐ९गाणगापूर, कर्नाटक श्री नृसिंह सरस्वतींचे सुमारे २३–२४ वर्षे वास्तव्य; गुरुचरित्र अ. २२–५१
- ॐ१०श्रीशैल व कर्दळीवन, आंध्र प्रदेश श्री नृसिंह सरस्वतींचे निजगमन (अ. ५१); तंतुकाची यात्रा (अ. ४३)
- ॐ११बीदर, कर्नाटक रजक ते बादशहा – दोन जन्मांची कथा (अ. ९, २५, ५०)
- ॐ१२माणिकनगर (हुमनाबाद), कर्नाटक श्री माणिकप्रभू – दत्तावतार म्हणून मानले जाणारे संत (इ.स. १८१७–१८६५)
- ॐ१३माहूर (मातापूर), महाराष्ट्र दत्तांचे निद्रास्थान; अत्रि-अनसूया आश्रम परंपरा
- ॐ१४कोल्हापूर (करवीर), महाराष्ट्र दत्तांचे भिक्षास्थान
- ॐ१५पांचाळेश्वर, महाराष्ट्र दत्तांचे भोजनस्थान (लोकपरंपरा)
- ॐ१६अक्कलकोट, महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ – श्री नृसिंह सरस्वतींचे पुनरागमन मानले जाते (समाधी १८७८)
- ॐ१७माणगाव, महाराष्ट्र श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे जन्मस्थान (इ.स. १८५४)
- ॐ१८गिरनार (दत्तशिखर), गुजरात श्री दत्तात्रेयांची तपोभूमी
- ॐ१९गरुडेश्वर, गुजरात श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांची समाधी (इ.स. १९१४)